Top News

शिवजयंती जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा.

निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, आणि युवा वर्ग मूल यांच्या  पुस्तक वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम.
Bhairav Diwase.        Feb, 20, 2021
मुल:- बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांची जयंती शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारीला 'युवा वर्ग मूल तर्फे अत्यानंदाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी युवावर्ग तर्फे  शिवरायांच्या चरित्रावर आधारित 500 पुस्तकांचे वाटप करण्यात आले. पुस्तकांच्या लाभार्थांत लहान मुले, तसेच दहावी ते बारावीचे विद्यार्थी यांचा समावेश होता.  पुस्तके शहरातील इतर वार्डांत वाटप करण्यात आले.  या प्रसंगी श्री.निखिल भाऊ वाढई, प्रणित भाऊ पाल, आकाश भाऊ येसनकर यांनी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन शिक्षणात प्रगती करावी असे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रम आयोजित करण्यात बोद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष  शमीभाऊ डोलरीकर व युवा वर्ग, निहाल गेडाम,साहिल खोब्रागडे, सुमित शेंडे,रोहित शेंडे , सुरज गेडाम, आनंद येसनकर, चेतन दहिवले, प्रणय रायपुरे*  यांचे मोलाचे योगदान दिले. शिवरायांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्यात यावी. शिवजयंतीला मद्यपान करून तसेच नाचगाणी करुन शिवरायांचा अपमान करू नये. शिवरायांच्या विचारांवर चालून समाजात व म्हणूनच देशात बंधुभाव व सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यात यावे. असा उपरोक्त युवा वर्गाच्या बोलण्याचा कल होता.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन दिलीपभाऊ गेडाम  यांनी केले, तर महेंद्रभाऊ गोंगले यांनी आभार प्रदर्शन केले. अनिकेत वाकडे,निलेश लाटकर, बादल नागोसे,साहिल मेश्राम, सायक खोब्रागडे,उपस्थित होते. जय शिवराय, जय भीमच्या, जय जिजाऊ गर्जनेत कार्यक्रम पार पाडला गेला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने