दिव्यांग मोर्चा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन.
महानगर भाजपाचा उपक्रम.
चंद्रपूर:- दिव्यांगव्यक्तीमध्ये एक अलौकिक शक्ती असते.त्यांचा आत्मविश्वास इतरांपेक्षा दृढ असतो.त्यांना मदतीचा हात दिला तर,अशक्यही शक्य होऊ शकते.भारतीय जनता पार्टी,महानगर तर्फे मदतीचा हात दिला जाईल.आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी भाजपा महानगर दिव्यांग मोर्चा लढा देईल,असे प्रतिपादन भाजपा महानगर महामंत्री व नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार यांनी केले.ते शिवजयंती निमित्य राष्ट्रवादी नगर येथे आयोजित दिव्यांग मोर्चाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करतांना उदघाटक म्हणून शुक्रवारी(१९ फेब्रुवारी)ला बोलत होते.
यावेळी दिव्यांग मोर्चाचे महानगर जिल्हा संयोजक श्रीराम पान्हेरकर,भाजपा माध्यम संपर्क प्रमुख प्रशांत विघ्नेश्वर,माला रामटेके ,देवराव कोंडेकर,संजय डाखोरे, धनराज चव्हाण,श्री धाबेकर, कु किरण आडे खुशाल ठलाल प्रिया रामटेके, पूजा राखोंडे, प्रा. रुकैया शेख यांची उपस्थित होती.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
कासंगोट्टूवार म्हणाले,चंद्रपूर शहरातील दिव्यांग बांधवांनी हक्क, सवलती व अडचणी सोडविण्यासाठी दिव्यांग मोर्चा महानगर कार्यालय तुळशी नगर चंद्रपूर ला संपर्क करावा.कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचालन श्रीराम पान्हेरकर यांनी केले तर देवराव कोंडेकर यांनी आभार मानले.