स्वराज्य रक्षक मंडळ जांब रैयतवारी यांच्या विद्यमाने शिवजयंती उत्सव जि. प. प्राथ. शाळा जांब रैयतवारी च्या प्रांगणात साजरी.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- स्वराज्य रक्षक मंडळ जांब रैयतवारी यांच्या विद्यमाने शिवजयंती उत्सव जि. प. प्राथ. शाळा जांब रैयतवारी च्या प्रांगणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पानसे साहेब कृषी पर्यवेक्षक सावली व श्री काळे साहेब कृषी सहायक कृषी विभाग सावली व इतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस मालार्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली. यावेळी श्री कांबळे सर जि. प. प्रा. शाळा जांब रैयतवारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला तसेच श्री काळे साहेब यांनी कृषी विभागाच्या विविध योजना समजावून सांगितले. तसेच पानसे साहेबांनी शिवाजी महाराज यांच्या काळात शेती कोणत्या प्रकारे केली जायची आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी काय काय योजना तयार केलेल्या होत्या, त्यांचं शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगितला. तसेच सर्व तरुण युवकांनी केवळ शिवाजी महाराज जयंती साजरी न करता त्यांचे विचार अंगिकारून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा हा सुध्या संदेश दिला. सर्व कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंग चा पालन करून लहान लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री वाढणकर सर मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक शाळा जांब रैयतवारी व गावातील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बोदलकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य अनिल तिवाडे तसेच गावातील नवयुवक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन नवनाथ वासेकर यांनी केले तर प्रास्ताविक किशोर फाले आणि आभार प्रदर्शन कांबळे सर यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वराज्य रक्षक मंडळाच्या सर्व शिलेदारांनी विशेष परिश्रम घेतले.