शिवरायांचे पर्यावरण विषयक धोरण या विषयावर श्री शिवाजी महाविद्यालयात आभासी व्याख्यान.

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील इतिहास विभाग व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त शिवरायांचे विविध पैलू उलगडत असतांनाच त्यांची पर्यावरण विषयक धोरण विद्यार्थ्यांना माहिती व्हावे, जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होईल व त्यातून पर्यावरण संवर्धनाचे कार्य होईल यासाठी "छत्रपतींचे पर्यावरण विषयक धोरण"  या विषयावर आभासी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करण्यात आले.

    या व्याख्यानास प्रमुख वक्ते म्हणून जनता महाविद्यालय चंद्रपूर येथील भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. योगेश दुधपचारे उपस्थित होते. डॉ. दुधपचारे यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपतींच्या पर्यावरण विषयक कार्याचा लेखाजोखा मांडला.
    
    शिवाजी महाराजांनी आपले किल्ले बांधताना जिथे नैसर्गिक पाण्याचा स्रोत असेल अशा ठिकाणाला प्राधान्य देऊन जिथे नैसर्गिक स्रोत नसेल अशा ठिकाणी त्यांनी पहिले पाण्याची सोय केली आणि नंतर किल्ला बांधला, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पोहचविण्यासाठी तलाव खोदली, गडकिल्यावर शौचालये निर्माण करून स्वच्छतेलाही तितकंच महत्त्व दिलं असे प्रतिपादन आपल्या व्याख्यानातून केले.
    
       या आभासी व्याख्यानास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.वारकड, आ. शि. प्र. म. चे सचिव मा. अविनाश जाधव,  सोबतच इतिहास विभाग प्रमुख प्रा.गुरुदास बलकी, भूगोल विभाग प्रमुख डॉ. प्रमोद वसाके, तसेच इतिहास प्रेमी प्राध्यापक व संशोधक, विद्यार्थी या  आभासी व्याख्यानाच्या कार्यक्रमात ऑनलाइन उपस्थित होते.
       
       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा नलगे, प्रास्ताविक डॉ. प्रमोद वसाके तर आभार प्रा. गुरुदास बलकी यांनी मानले..

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)