🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

साईशांती मित्र परिवार तर्फे वृक्षारोपण.

एक शिवजयंती अशीही.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- - कोरोना च्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्य शासनाने शिवजयंती साजरी करण्या वर बंधन आणली असताना. गडचांदूर येथील साइशांति नगरातील साइशांति मित्र परिवार तर्फे वृक्षारोपण करून जयंती साजरी करण्यात आली. गडचांदूर हे औद्योगिक शहर असल्याने येथे प्रदूषण हा मोठा प्रश्ण आहे यात प्रदूषणाला कुठे तरी आळा घालण्यासाठी युवकांचा केविलवाणा प्रयत्न आपल्याला या वृक्षारोपणाचा माध्यमातून दिसत आहे. दरम्यान साइशांति नगरातील प्रत्येक युवकांनी स्वताच्या घरासमोर एक वृक्ष लावून यात सहभाग घेतला.

यावेळी वैभव राव, नीलेश चीने, अक्षय मेश्राम, सूरज बोबडे, आकाश गायकवाड, विशाल राव, अतुल बोबडे, संकेत बोढ़े, सुहास बोंडे, श्रीनिवास पवार, दत्तू पानघाटे,सुमित नागे, समीर ये‍डमे, रेहान निज़मी, ऋषी चटप, गिरीश धवणे, क्रिश वैद्य, व मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत