Click Here...👇👇👇

मूर्ती शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मूर्ती , पं. स. राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वरजी डाखरे  यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व मालार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थी आपल्या भाषणातून भरभरून अभिव्यक्त झाले. 
      सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रियानी प्रवेश जुलमे , तर आभार प्रदर्शन कु. श्रेया पंढरी पिपरे या विद्यार्थीनींनी आत्मविश्वासाने केले. 
      याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. कल्पनाताई कोडापे , मुख्याध्यापक श्री. महेश शेंडे सर, श्री मनिष मंगरूळकर सर , श्री. दयानंद पवार सर , श्री. संजय बोबाटे सर व शालेय विद्यार्थीवृंद उपस्थित होते.