Click Here...👇👇👇

पक्ष संघटनेतला कोहीनुर गमावला:- आ. सुधीर मुनगंटीवार., #chandrapur

Bhairav Diwase
⛔ पोंभुर्णा भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार यांचे निधन.

भाजपा पोंभुर्णा तालुकाध्‍यक्ष गजानन गोरंटीवार यांच्‍या निधनाने कोहिनुर हिऱ्यासारखा कार्यकर्ता आम्‍ही गमावल्‍याचे तीव्र दुःख मला आहे. अशा शब्‍दात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्‍यक्‍त केली आहे.

गजानन गोरंटीवार यांच्‍या निधनाने माझा अतिशय ह्रदयस्‍थ पदाधिकारी हरपला आहे. पोंभुर्णा शहर असो वा तालुक्‍याचा ग्रामीण भाग भाजपाचे संघटन बळकट करण्‍यासाठी त्‍यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. जनतेच्‍या हाकेला तत्‍परतेने ओ देणारा हा नेता पोंभुर्णा तालुका भाजपाची जमेची बाजु होती. असा सह्दयी, लोकाभिमुख नेता अल्‍पवयातच हे जग सोडुन जाणे ही बाब प्रचंड धक्‍कादायक आहे, या बातमीवर माझा काही काळ विश्‍वासच बसला नाही. त्‍यांच्‍या निधनाने भाजपा परिवारासह एकुणच राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्‍यांच्‍या परिवारावर कोसळलेले दुःख मोठे आहे. या दुःखातुन सावरण्‍याचे बळ त्‍यांच्‍या कुटुंबियांना परमेश्‍वर देवो असेही आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.