जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🇮🇳

🇮🇳 🙏

🙏🏻

१ मे हा दिवस विदर्भातील जनतेसाठी काळा दिवस म्हणून पाळत आहो- विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा अध्यक्ष श्नी सुदामभाऊ राठोड(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- १ मे १९६० मध्ये विदर्भ राज्याला जबरदस्तीने महाराष्ट्रात ढकलण्यात आले तेव्हा पासून विदर्भावर अन्याय चालूच आहे. आज १ मे हा दिवस सर्व विदर्भातील तमाम जनता काळा दिवस म्हणून पाळत आहो.जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही,तोपर्यंत मी सुदाम रामराव राठोड (जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपूर) आज संकल्प करतो की विदर्भाचा स्वतंत्र राज्य घेतल्या शिवाय गप्प बसणार नाही, माझ्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब मी विदर्भासाठी व विदर्भातील जनतेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत झटत राहील.


मी माझ्या सर्व विदर्भ प्रेमींना आव्हान करतो की जोपर्यंत तुम्ही आम्ही सर्व मिळून लढा देत नाही तोपर्यंत आपल्याला गुलामीच्या पलीकडे स्वतंत्र विदर्भ दिसणार नाही.
चला आपल्या हक्कासाठी दोन हात करूया भावी पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व एकत्र होवून लढा देण्याची गरज आहे.विदर्भामध्ये आपल्या कमजोरी मुले ४ आमदार व २ खासदार कमी झाले आहे म्हणून प्रत्येक क्षणा-क्षणाला आपल्यावर अन्याय होत आहे.मग चला तोडूया गुलामीची बेडी , मिळवून घेऊया आपल्या हक्काचा विदर्भ राज्य.विदर्भ राज्य मिळाले तर सर्व क्षेत्रामध्ये १००% नोकरी विदर्भातील तरुणांना मिळेल.सिंचनाची नावीन्य क्रांती घडेल.उद्योग, व्यापार, शेती,शिक्षण, आरोग्य संस्कृती, भौगोलिक वनसंपदा या सर्व घडामोडीचा नव्याने विकास होणार २८ सप्टेंबर १९५३ च्या नागपूर करारानुसार २३% प्रत्येक क्षेत्रामध्ये वाटा देण्याचा मान्य केले होते, पण अस कधीच होताना दिसत नाही.विदर्भातील सर्व तरुण-तरुणी व शेतकरी, व्यापारी, कष्टकरी माय बापाला माझी विनंती आहे की, या विदर्भ लढ्यामध्ये लाखोंच्या संख्येने सामील व्हा.आपल्या हक्काची लढाई लढण्यास तयार व्हा पुढे या आणि सर्व मिळून आपली लढाई जिंकूया, आपले राज्य विदर्भ राज्य हे घोष वाक्य अंमलात आनुया, भावी पिढीला न्याय मिळवून देऊया.
विदर्भ राज्य झाले तर नक्षलवाद, कुपोषण,बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या,शिक्षण, आरोग्य या क्षेत्रामध्ये नवी क्रांती घडून येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत