जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

पोंभूर्ण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस साजरा.


पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर येथील रूग्णांना नारळ पाण्याचे वितरण.

जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या पुढाकाराने.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभूर्णा:- माजी अर्थ मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत आदर्श शेतकरी प्रदीप दिवसे यांच्या हस्ते पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर मधील  रुग्णांना नारळ पाणी देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस सर्वत्र साजरा होत आहे. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी अर्थ मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत आदर्श शेतकरी प्रदिप दिवसे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथील कोविड सेंटर मधील रुग्णांना नारळ पाणी देण्यात आले. रुग्णांना आरोग्य मय शुभेच्छा देऊन ना. नितीन गडकरींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित जयंत पिंपळशेंडे, अनूप श्रीकोंडावार, मंगेश माडे, चंद्रशेखर झगडकर, राहुल वासेकर इ. भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत