Top News

डाॅ.अविशा मडावी यांची पुन्हा नियुक्ती करा; नागरिकांची मागणी.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- कोरोना काळात रूग्णांची उत्कृष्ट सेवा करून कोरोना योद्धा ठरलेल्या व कर्तव्यदक्ष असलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डाॅ.अविशा मडावी यांची भद्रावतीच्या ग्रामीण रूग्णालयात पुन्हा नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डाॅ. अविशा मडावी यांना येथून नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले. त्यांनी येथे कोरोना काळात रूग्णांची चांगली सेवा केली आहे. त्यामुळेच त्या कोरोना योद्धा ठरलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्या गर्भवती असतांना सुध्दा दिवस असो कि राञ त्या आपले कर्तव्य पार पाडायच्या. त्यांची रूग्णासोबतची वागणूक शांत खेळीमेळीची होती. रूग्णांना व रूग्णालयातील ईतर कर्मचा-यांना सुध्दा त्यांचा कोणताही ञास नव्हता. 
आजच्या कोरोनाच्या परिस्थिती मध्ये येथील ग्रामीण रूग्णालयाला अशाच कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचा-यांची गरज आहे. सुमारे पंधरा दिवसाचापूर्वी एका रूग्णाला छातीत दुखत असल्यामुळे येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डाॅ.अविशा मडावी राञी उठुन त्या रूग्णालयात आल्या त्यांनी प्रथम त्या रूग्णाला धीर देऊन त्याची तपासणी केली व त्याच्यावर उपचार केले. त्यामुळे तो रूग्ण बरा झाला. विशेष म्हणजे त्या रूग्णाला चंद्रपुरला हलविण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
 परंतु डाॅ. आविशा मडावी मॅडम यांनी काळजी पूर्वक उपचार करून औषधी दिल्याने त्या रूग्णाला बरे वाटायला लागले. यावेळी परिचारिका अर्चना कुकूडकर व कर्मचारी अतुल सारससर यांनीही डाॅ.मडावी यांना चांगले सहकार्य केले. त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष अधिकारी डाॅ.अविशा मडावी यांना पुन्हा येथील ग्रामीण रूग्णालयात नियुक्त करण्यात यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने