Click Here...👇👇👇

जिल्हा परिषद सदस्या स्वाती वडपल्लीवार यांच्या हस्ते गर्भवती महिलांना बेबी केअर किटचे वाटप. #gondpipari

Bhairav Diwase
1 minute read


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामार्फत जिल्हा परिषद चंद्रपुर महिला बालकल्याण विभागातर्फे धानापुर येथे गर्भवती महिलांना बेबी केअर किटचे जिल्हा परिषद सदस्या स्वाती वडपल्लीवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आरोग्यासाठी हितकारक अशी ही योजना असल्याने लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

नवजात बालकांचे कपडे, मच्छरदाणी, तेल, बॉडी वॉश लिक्विड, प्लास्टिक लंगोट, लहान मुलांच्या झोपण्याची गादी, लहान मुलांचे टॉवेल, थर्मामीटर, तेल, गरम ब्लँकेट, खेळणी, प्लास्टिक चटई, मुलांची नखे काढण्यासाठी नेलकटर, हात मोजे व पायमोजे, हात धुण्याचे लिक्विड, सर्व साहित्य ठेवण्यासाठी बॅगेत साहित्य होते.

यावेळी सुशीला गोविंदा वागदरकर अंगणवाडी सेविका, शोभा बंडू इसनकर अंगणवाडी सेविका, व लाभार्थी महिला उपस्थित होते.

#gondpiparinews #gondpipari #chandrapurnews #chandrapur #Adharnewsnetwork