🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अखेर तोडगा निघाला. #Korpana


दालमिया सिमेंट उद्योगात मृत्यू पावलेल्या तरुणाला कामगारांच्या एकीकरनाणे सात तासानंतर मिळाला न्याय.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
गडचांदूर:- सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत उंचीवर काम करीत असलेल्या एका कंत्राटी कामगाराचा ऊंचीवरून पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना दिनांक २९/६/२०२१ ला दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली. मृतक कामगाराचे नाव संतोष चव्हाण वय 28 रा. नांदा फाटा आहे असे सांगितले जात आहे.

दालमिया सिमेंट कंपनीत कंत्राटी कामगाराचा ऊंचीवरून पडून मृत्यू.

नारंडा येथील दालमिया सिमेंट प्लांट मधे काल दुपारी उंचीवर संतोष चव्हाण नामक कंत्राटी कामगार काम करीत होता. तो अचानक खाली पडल्याने त्याला तात्काळ गडचांदूर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. गडचांदूर येथील रुग्णालयात आणताच क्षणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दालमिया सिमेंट कंपनीतील सर्व युनियनचे पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले असून सोबतच दालमिया कंपनीचे व्यवस्थापन कमीटी सुद्धा रुग्णालयात हजर होती मृतकाच्या कुटुंबातील दोन  सदस्याना  कंपनीत स्थायी नौकरी व आर्थिक साहाय्य देण्याची मागणी  कामगार संघटनेनी केली त्यात पाच ते सहा तास ताळमेळ सुरु होता.
अखेर आज दालमिया सिमेंट उद्योगात संतोष चव्हाण याचा अपघाती मृत्य झाला त्याच्या परिवाराला आर्थिक मोबदल्यासह त्याचे परिवारातील व्यक्तीला दालमिया कंपनीमध्ये स्थायी नौकरी व आर्थिक मदत दयेण्यास कंपनी तयार झाली 
कामगार एकवटले जवळपास  सात तास गडचांदूर ग्रामीण रुग्णालयासमोर सर्वांनी ठिय्या मांडल्याने अखेर दालमिया सिमेंट उद्योगाला मागण्या मंजूर कराव्या लागल्या. मृतकाचे परिवाराला १६ लाख रुपये मोबदला दोन मुलांना नोकरी व इन्शुरन्स इत्यादीचे ६ लाख असे जवळपास २२ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. 

#death #korpananews #chandrapurnews #chandrapur # #adharnewsnetwork