💻

💻

पं. स.सभापती चंदू मार्गोनवार यांची ग्राम विकास अधिकाऱ्यास धमकी. #Threat

ग्राम विकास अधिकारी यांची वरिष्ठांकडे तक्रार.

सभापती म्हणतात तो मी नव्हेच.

मुल:- भारतीय जनता पक्षाचे परिसरातील दबंग युवा नेते व माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले मुल पंचायत समितीचे विद्यमान सभापती चंदू मार्गोनवार यांचे बेंबाळ च्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना धमकीवजा तंबी दिलेले पत्र सध्या समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसत असून या प्रकरणाला कोणते वळण मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान या पत्रामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मुल पंचायत समिती सभापतींचे गाव असलेल्या व त्यांचे ग्रामपंचायतीवर एकछत्री प्राबल्य असलेल्या बेंबाळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री सुखदेवे यांना गावातील विविध विकासकामांच्या संदर्भातील काढण्यात आलेल्या निविदा रद्द करून माझ्याच माणसांना व आप्तेष्टांना देण्यात याव्यात अन्यथा सेवेतून घरी बसावे लागेल. अशा आशयाचे धमकीवजा तंबी भरलेले पत्र सभापतींनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्याने बेंबाळ येथे एकच खळबळ उडाली असून सभापती चंदू मारगोनवार यांनी मात्र तो मी नव्हेच ची भूमिका घेतलेली आहे.

दरम्यान या घटनेची तक्रार बेंबाळ येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे दाखल केलेली असून शासन परिपत्रक क्रमांक झेडपी ए १००५/९४ मुस/प्र क्र 104/पंचायत राज मंत्रालय मुंबई दिनांक 17 जुलै 2007 च्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत पदाधिकारी किंवा बाहेरील व्यक्तींनी गैरवर्तणूक केल्यास व हस्तक्षेप केल्यास मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 1 अन्वये सरपंच उपसरपंच सदस्य व तत्सम व्यक्तींना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार कारवाई करून संबंधितास पदावरून मुक्त करण्यात यावे अशी मागणी येथील ग्राम विकास अधिकारी श्री सुखदेवे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेकडे केली आहे. तक्रारीची प्रत मुख्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मूल, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल यांना उचित न्यायासाठी प्रत सादर करण्यात आली असून चौकशीअंती संबंधित पदाधिकारीही दोषींवर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
                   

      दरम्यान सभापती चंदू मार्गोनवार यांनी म्हटले कि माझ्या लेटर पॅड वरील व माझी सही असलेले पत्र हे सर्वस्वी खोटे आहे आणि बनावटी आहे. असे पत्र व्हायरल करणाऱ्या च्या विरोधात आपण ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.


#Threat # Chandrapur #Chandrapurnews #mulnews

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत