🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

ओबीसी असल्यामुळे नाही तर तुम्ही विदर्भाचे असल्यामुळे हा भेदभाव? #Discrimination

वड्डेटीवारांना ऍड.अणेंचा सल्ला.. तर पहा काय बोले ऍड.चटप विदर्भातील ६२ आमदारांन बद्दल.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मी ओबीसी असल्यानेच मला महसूल ऐवजी हे खातं मिळालं या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षातील नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार यांचं वय पाहिलं तर पुढे त्यांना मोठी संधी मिळेल, थोडी वाट पाहावी लागेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 
बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेस जातीयवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. विजय वड्डेटीवार यांना काही तरी वेगळं बोलायचं असेल. काँग्रेसने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं. बॅरिस्टर अंतुले यांना संधी काँग्रेसने दिली. वड्डेटीवार यांचं वय पाहिलं तर त्यांना मोठी संधी पुढच्या काळात मिळेल,थोडी वाट पाहावी लागेल.
वाघ आणि वड्डेटीवार जुना संबंध....

वाघ आणि वड्डेटीवार जुना संबंध आहे. शिवसेनेने नाराज होण्याची गरज नाही. ताडोबा अभयारण्य त्यांच्याच म्हणजे वडेट्टीवारांच्या भागात आहे. वाघ आणि आमची जवळीक चांगली आहे, चांगले संबंध आहेत, अडचण नाही. आघाडी भक्कम आहे, पाच वर्षे काम करणार, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
ऍड.श्रिहरी अणे यांची प्रतीक्रीया....

माजी महाधिवक्ता ऍड श्रीहरी अणे यांनी वड्डेटीवारांना सल्ला दीला आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री न‌ होता,परकीय राज्यात मंत्रीपदाची भिक्षा मागत फिरणे शोभा देत नाही.आपल्या सारख्या सुसज्ज नेत्याने विदर्भ राज्याची मागनी करावी महाराष्ट्रात मंत्रीपदाची नव्हे. असा सल्ला आता  ऍड.श्रिहरी अणे यांनी वडेट्टीवारांना दीला आहे.
जेष्ठ विदर्भवादी नेते विदर्भराज्याचे प्रनेते ऍड.वामनराव चटप यांची प्रतीक्रीया...

जेष्ठ विदर्भवादी नेते विदर्भराज्याचे प्रनेते ऍड.वामनराव चटप यांना या बद्दल विचारना केली असता ते त्यांचा पक्षाचा आणी त्यांचा मुख्यमंत्रांचा अंतर्गत विषय आहे, आपन त्यावर काय प्रतीक्रीया देणार बोलायचच झाल तर विदर्भातील सर्व पक्षीय ६२ ही आमदारांनी पदांसाठी रळत बसण्या पेशा "अबकी बार विदर्भकी सरकार" निर्माण कराव अस विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना ते म्हनाले.
 अस बोलतांना विदर्भातील युवकांन साठी ही ऍड.चटप यांनी एक संदेश दिला आहे, ते युवकांना म्हनाले की,

 "इंसाफकी डगर पे बच्चो दिखाओ चलके ये होनेवाला राज, ये राज है तुम्हारा नेता हो नुम्ही कलके..."
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले होते?  

ओबीसी आरक्षणासाठी विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या मंथन बैठकीचं आयोजन लोणावळ्यात करण्यात आलं होतं. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, “मी विरोधी पक्षनेता होतो. ओबीसींचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे ना”.
मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले होते.
 पाहुयात त्यांच्या भाषणातले 15 मोठे मुद्दे.
1. मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू. ओबीसीवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल.

2. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही, बावनकुळे साहेब माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही.

3. झुकायला आणि वाकायला तयार आहे समाजासाठी मला रोज धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारही नाही.

4. महाराष्ट्रात तीन दिवस फिरलो तरी 25 लाखांची सभा होईल. झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये.
5. ओबीसीचं खातं भेटले तेव्हा चपराशीही नव्हता, उधारीवर चालवतो खातं. समाज कल्याणच्या भरवशावर हे खातं चालवतो. ओबीसी खात्यातल्या जागा भरायला पैसे नाही म्हणता, कार्यालयाला जागा नाही. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं पण चुकी झाली.

6. विरोधी पक्षनेता होतो, ओबीसीचं नेतृत्व करतो. वाटलं महसूल खातं मिळेल, पण भेटले हे खातं. का भेटते ओबीसी आहे ना मी. पंकजा ताईलाही ग्रामविकास खातं भेटलं होतं.

7. निवडणूका झाल्या, कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा, आणि गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे

8. माझं काय होईल ते होईल, पण ओबीसीच्या मुद्यावर मी शांत बसणार नाही आपलं अडले चर सगळेच बाप म्हणावं लागतं. फडणवीस साहेबांना घेऊन जाऊ वेळ पडली तर पंतप्रधानांच्या पाया पडू.

9. या आठवड्यात आयोगाला पत्रव्यवहार करु, त्यांना डाटा गोळा करायला हवं ते देऊ.

10. कोरोना आहे. आम्ही निवडणूक आयोगाला मणुष्यबळ देणार नाही. काय करायचं ते करा. कुठून आणणार मनुष्यबळ? यूपी वरुन का?
11. काय होईल ते होऊ द्या, गेलो तर जमानत घ्यायला या.

12. कोरोना लाट गेली, की ओबीसींचा पहिला विराट मोर्चा औरंगाबाद येथे होणार.

13. जेवढे पैसे सारथी मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील. मी बसलोय इथे. एक सारथी मराठा समाजासाठी आणि ओबीसींतल्या 425 जातींसाठी महाज्योती

14. आमच्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही. मी माझी संघटना काढत नाही. सर्व संघटनांनी मिळून लढाई लढायची आहे

15. वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो
#Discrimination