प्रियकराच्या हातून प्रियसीची हत्या? सदर घटना संशयाच्या भोवऱ्यात. #Murder

Bhairav Diwase
हत्या की आत्महत्या? कारण मात्र गुलदस्त्यात.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील दीक्षा बांबोळे वय वर्ष 21 हि तरुणी विनोद जक्कुलवार या तरुणाकडे त्यांच्या फोटो स्टुडीओत व सेतू केंद्रात नेहमीच जात होती. या दोघांचे हळूहळू प्रेमसंबंध जुळून आले. या प्रेम संबंधातूनच ति गर्भवती झाली. दीक्षा बांबोळे हिने गर्भवती झाल्याचे वारंवार सांगून सुद्धा विनोद जक्कुलवार यांनी लग्नास नकार दिला व तिच्या सोबत लग्न न करता तिचा गर्भपात केला.

🥛जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय सतरा वर्षांचा "भुजंग"

दिनांक 21 जुलै रोजी दीक्षा बांबोळे ही एकटीच घरी असल्याचा फायदा घेऊन विनोद जक्कुलवार यांनी घरी येऊन अगोदर तिला मारहाण केली, नंतर तिचा गडा दाबून हत्या केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. दि. २४ जुलैला मृतक दीक्षा बांबोळे ची आई किरण अविनाश बांबोडे यांनी आष्टी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिलेली आहे. सदर खून हा जातीय तिरस्कारातून व सतत लैंगिक शोषणातून झाला असवा अशी चर्चा गावात सुरू आहे. परंतु हि हत्या की आत्महत्या? कारण मात्र गुलदस्त्यात आहे. सदर प्रकरणाची पोलीस काय कारवाही करतात? या प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
    मृतक मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी भिम आर्मी चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डोहने, शेडुलकास्ट फेड्रेसशन चे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बांबोडे, जिल्हा अध्यक्ष मेश्राम, पोलीस पाटील मारकबोडी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम, रामटेके सर येनापूर यांनी मृतक मुलीच्या घरी जाऊन भेट देऊन सदर प्रकरणाला वाचा फोडली. गुन्हेगारास अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सेडुलकास्ट फेड्रेसशनने दिला आहे. #Murder