🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

एन. एम. एम. एस. परीक्षेत लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थीनींचे यश. #Success(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच दि.२६ जुलै रोजी जाहीर झाला असून येथील लोकमान्य विद्यालयाच्या तीन विद्यार्थीनींनी यश प्राप्त केले आहे.
फक्त इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच असलेली ही परीक्षा शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये दि.२१ मार्च रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत लोकमान्य विद्यालयाच्या तन्वी महेशकुमार निमसरकर, परहत इस्माईल शेख आणि तन्वी वसंत जीवतोडे यांनी उत्कृष्ट गुणांसह यश प्राप्त केले.
ह्या तीनही यशवंत विद्यार्थीनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मुख्याध्यापक बंडू दरेकर, उपमुख्याध्यापिका आशालता सोनटक्के, पर्यवेक्षक लक्ष्मण बोढाले, मार्गदर्शक शिक्षिका भारती संघार्थी आणि सर्व शिक्षकांना दिले आहे.
    विद्यार्थीनींच्या यशाबद्दल लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार,सचिव मनोहरराव पारधे, मंडळाचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले आहे.
       या परीक्षेत पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत दर वर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.#Success