Top News

शिव पांदन रस्ते त्वरीत दुरुस्त करा; डाॅ. अंकुश आगलावे यांची मागणी. #Road



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील शिव पांदन रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून हे रस्ते त्वरीत दुरुस्त करण्यात यावे,अशी मागणी केंद्रिय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डाॅ. अंकुश आगलावे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे नुकतीच केली आहे.
 निवेदनात डाॅ. अंकुश आगलावे यांनी म्हटले आहे की,  शेत पांदन रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोगात आणले जातात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात. त्यामुळे पावसाळयातही शेत पांदन रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे. 
        शेताला जोडणारा रस्ता हा पांदन रस्ता असल्याने  शिवपांदन रस्त्याची अवस्था अत्यंत खराब दयनिय झालेली आहे. तसेच पांदन रस्त्यावर ठिक-ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेले आहे. काही शेतालगतची रस्त्यांची पुनर्मोजणी करण्यात आलेली  आहे. परंतू रेकाॅर्ड दुरूस्ती करण्यात आलेली नाही. प्रशासन व जनप्रतिनिधींनी या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.  तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीकडून याबाबत विशेष  ठराव मागून पांदन रस्त्याची  दुरूस्ती करण्याचे शेतकरी हिताचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.#Road

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने