Top News

लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्णा येथे भाजपच्या वतीने सेवा दिन. #Socialwork

सेवादिनानिमित्य रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, कोरोणा योद्ध्यांचा सन्मान व फेसशिल्डचे वितरण.

पंचायत समितीत आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना अर्थसहाय्य तर लाभार्थ्यांना बेबी किटचे वितरण.


पोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा यांच्यावतीने राज्याचे माजी अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, लोकलेखा समिती प्रमुख, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस (३० जुलै) सेवादिन म्हणून विविध सेवेचे कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.


यानिमित्त ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केल्या गेले होते. ज्यामध्ये तालुक्यातून ४० रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले. यावेळी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते रूग्णालय परीसरात पेरू, नारळ, आंबा, सिताफळ, मोसंबी अशा फडझाडांची लागवड करण्यात आली. आणि जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग पा. पाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदात्यांसह आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या कोरोणा योद्ध्यांना सन्मानपत्र, फेसशिल्ड, माॅस्क व सॅनिटायझर देऊन गौरविण्यात आले.
यासोबतचं पंचायत समिती स्तरावर विविध योजनांचे लाभार्थ्यांना वाटप व वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आले.
याठिकाणी पं. स. परीसरात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांचेहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आंतरजातीय, दिव्यांग विवाहीत जोडप्यांना अर्थसहाय्य, दिव्यांगाना कार्डचे वाटप व लाभार्थी महिलांना बेबीकीट तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभाचेही वितरण यावेळी करण्यात आले.


याप्रसंगी बोलताना, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सेवेचे विविध कार्यक्रम आपल्या संपुर्ण जिल्ह्यात आज पार पडत आहेत. खरंतर राजकीय क्षेत्रातलं अलौकिक नाव म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार!
सुधीरभाऊंचे नेतृत्व म्हणजे गोरगरिबांना मदत करणारे संवेदनशील नेतृत्व आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना विकासपुरुष सुधीरभाऊंनी मागील पाच वर्षात पोंभुर्णा तालुक्याचा न भूतो असा नव्हे कायापालट केला. आणि आजही तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी सुधीरभाऊ अग्रणी आहेत.
कोरोणा सारख्या संकटकाळात मागील वर्षभरापासून आदरणीय सुधीरभाऊंनी एका कुशल प्रशासकाप्रमाणे जिल्ह्याचे खंबीरपणे नेतृत्व केले, सुयोग्य नियोजन केले. शासन प्रशासनाच्या आधी सुधीरभाऊंनी भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांना जनसेवेसाठी व जनजागृतीसाठी कामाला लावले. शेकडो आभासी बैठका, गोरगरिबांना अन्यधान्य किट, शेकडो सॅनिटायझर मशीन, शेकडो आक्सीजन कान्संट्रेटर, लाखोंनी मॉस्क, सॅनिटायझर, रूग्णवाहीका, शववाहिका, रुग्णांना आर्थिक सहाय्य, बेड, व्हेंटिलेटर, जेवनासी सोय अशा अनेक गोष्टींची पूर्तता व्हावी यासाठी एक सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून सुधीरभाऊ चोवीस तास उपलब्ध होते.
त्यामुळेचं अशा सेवाभावी वृत्तीने लोकसेवेसाठी अग्रणी व आग्रही असणार्‍या आमच्या लोकनेत्याचा वाढदिवस आम्ही संपूर्ण जिल्ह्यात सेवा दिन म्हणून साजरा करतो आहोत.
मागच्या वर्षीपर्यंत आम्ही आजच्या दिवशी या शहरात भव्य रोगनिदान शिबिरांचे आयोजन करत होतो. त्यामध्ये परीसरातील हजारो गोरगरिबांच्या नानाविध आरोग्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न होत होता. परंतु कोविडमुळे यंदा काही मर्यादा आल्या. पण कोविड योद्ध्यांचा सन्मान, रक्तदान, वृक्षारोपण असे विविध सेवाभावी कार्यक्रम घेऊन आदरणीय सुधीरभाऊंच्या सेवावृत्तीला साजेसा असा सेवादिन आम्ही यानिमित्ताने आज संपुर्ण जिल्ह्यात साजरा करत आहोत. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
याप्रसंगी, पं. स. सभापती अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, गट विकास अधिकारी मरसकोल्हे मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मामीडवार, माजी नगराध्यक्षा सौ. श्वेता वनकर, पं. स. सदस्य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, माजी उपनगराध्यक्षा रजीया कुरेशी, शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, तालुका महामंत्री ईश्वर नैताम, ओमदेव पाल, हरीश ढवस, अजित मंगळगिरिवार, पं. स. सदस्य महेश रणदिवे, भाजयूमोचे तालुकाध्यक्ष अजय मस्के, वैशाली बोलमवार, सुनीता मॅकलवार, पांडुरंग पाल तुळशीराम रोहनकर, बालू पिंपळशेडे, रोशन ठेंगणे, सचिन पोतराजे, अविनाश ढोंगे, शामसुंदर नैताम, यशवंत ढोंगे, रंजीत पिंपळशेडे, रवी गेडाम, जनार्धन लेनगुरे, विकास दिवसे, गणपत फरकडे, गजानन मुदपुवार, दिलीप मॅकलवार, मोहन चलाख, नैलेश चिंचोलकर,भोजराज चुधरी, परशुराम वाढई कौशिक काळे हेमेंद्र देवाळकर, विनोद मारशेट्टीवार, राहुल पाल, विशू भाकरे, विनोद कानमपल्लीवर, वैभव पिंपळशेडे, आदित्य तुंमलवार, अमोल पाल, अमोल मोरे, सुधीर वडपल्लीवर, नेहा बघेल, माधुरी मोरे, वनकर मॅडम, महेंद्र कामिडवार, राजू ठाकरे, आशिष दाशेट्टीवार, नाना पोगुलवार, सुरज बुरांडे, दर्शन गोरंटीवार आदींसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.#Socialwork

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने