Click Here...👇👇👇

डालमिया भारत फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. #Korpana

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवलेला आहे. कित्येक लोकांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोविड वॅक्सिनेशन सुरू आहे. परंतु ए. डी. सिरिंजची कमी जाणवत असल्याने लसीकरणात व्यत्यय येत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वतः पुढाकार घेत डालमिया भारत फाउंडेशनच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याकरिता 50, 000 ए. डी. सिरिंज चे मा. जिल्हाधिकारी श्री. अजय गुल्हाने , जिल्हा खनन अधिकारी मा.श्री.सुरेश नैताम , जिल्हा उपआरोग्य अधिकारी मा. श्री. संदीप गेडाम यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. #Korpana
 ए. डी. सिरिंज मूळे जिल्ह्यातील 50,000 नागरिकांना कोविड वॅक्सिनेशनचा लाभ मिळणार आहे. डालमिया सिमेंट कंपनी चे एकझिक्युटिव डायरेक्टर मा. श्री. हक्कीमुद्दीन अली  यांच्या मार्गदर्शनाखाली ए. डी. सिरिंज चे वाटप करण्यात आले . यावेळी कंपनीचे युनिट हेड मा. श्री. सुनीलकुमार भुसारी , वरिष्ठ प्रबंधक श्री. हरिगोविंद मीना , श्री. अरविंद ठाकूर, यांची उपस्थिती होती. 
    जिल्हाधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कडुन डालमिया भारत फाउंडेशन व (मुरली) डालमिया सिमेंट ग्रुप चे आभार मानण्यात आले. #Adharnewsnetwork