नकोडा येथे 62 वर्षीय इसमाच्या मृतदेहाचा सांगाळा आढळला. Chandrapur

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- 24 जुलैला धानोरा फाटा जवळील वर्धा नदी पात्राजवळ अज्ञात महिला व पुरुष यांचे मृतदेह आढळले होते. त्यांच्या मृतदेहाची अजून ओळख पटली नसतांना 13 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजेदरम्यान नकोडा येथील वर्धा नदी चिंचोली घाटाजवळ अज्ञात इसमाच्या मृतदेहाचा सांगाडा मिळाला.
सदर माहिती मिळाल्यावर घुघुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, चौकशी दरम्यान पोलिसांना सदर मृतदेह यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे राहणारा 62 वर्षीय विलास बापूराव पवार अशी ओळख पटली.
6 महिन्यांपूर्वी कोरोनामुळे विलास च्या पत्नीचे निधन झाले होते, त्यामुळे विलास हा मानसिक तणावात गेला होता. अश्या आशयाचे सुसाईड नोट मृतकांच्या डायरीतून पोलिसांना मिळाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे, सपोनि मेघा गोखरे, संजय सिंह, अवधेश ठाकूर, सुधीर माटे व महेश मंधारे करीत आहे.