चंद्रपूर:- लोकनेते आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर , महामंत्री सुनील डोंगरे , प्रज्वलंत कडू व प्रमोद क्षीरसागर यांचे नेतृत्वात आज सोमवार ( २३ ऑगस्ट ) ला सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय व्यवस्थापन विरोधात आंदोलन केले जाणार आहे. जिल्हाज्ञसामान्य रुग्णालय येथील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढेपाळली असून त्याचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. परिणामी अनेकांना उपचारा अभावी आपली जीवनयात्रा संपवावी लागत आहे. #Movement #bjym
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अरेरावीचे धोरण अवलंबविले आहे. ही बाब जनतेवर अन्याय करणारी आहे . कुंभकर्णी झोपेत असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजयुमो तर्फे आंदोलन केले जाणार आहे . या संदर्भातील वृत्तांकनासाठी व भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर व इतर पदाधिकारी यांचेशी संवाद साधण्यासाठी आपण १२ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा माध्यम विभाग चंद्रपुर यांनी केले आहे. #Adharnewsnetwork