ट्रकची दुचाकीला धडक, एक जागीच ठार. #Accident #death

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील तेलंगणा महाराष्ट्र महामार्गावर सोंडो गावाच्या काही अंतरावर असलेल्या पुलाच्या वळणावर ट्रकची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. #Accident #death
टीएस २२ टी ४८९६ या क्रमांकाचा ट्रक राजुरावरून तेलंगणाकडे जात असताना ट्रकची दुचाकीला जबर धडक बसली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मुकेश सुधाकर ढोबे (३३) रा. वरूर रोड असे मृतकाचे नाव आहे. तो देवाडा येथे बाजार करून आपल्या स्वगावी जात होता. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला. #Adharnewsnetwork
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर एकच गर्दी उसळली. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती विरुर पोलिसांना कळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तत्काळ शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)