पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथून जवळच असलेल्या वेळवा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने काल विषप्राशन केले. त्यांना तात्काळ उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करून उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा रात्री मृत्यू झाला.
अनिल नानाजी जाधव वय 37 वर्ष असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव असूनत्यांनी विषप्राशन का केले हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. #Death
त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी , एक मुलगा, एक मुलगी व लहान भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून शासनाने त्यांना शासकीय मदत करावी अशी मागणी गावातून होत आहे. #Adharnewsnetwork