💻

💻

चार दिवस उलटले; मात्र नदीत बुडालेल्या तरुण बेपत्ताच. #Missing

🟥


पोंभुर्णा:- 19 ऑगस्ट रोजी वैनगंगा नदीत नाव उलटून तिघेजण बुडाले होते. मात्र त्यांच्यातील दोघांनी पोहून आपले जीव वाचविले, परंतु एकाला मात्र आपला जीव वाचवता आले नाही‌. आणि दशरथ भाऊजी भलवे हा 24 वर्षीय तरुण वाहून गेला. #Missing 🟥
प्रयत्नांची पराकाष्ठा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन च्या चमूने शोध मोहीम राबविली‌. मात्र वाहून गेलेल्या इसमाचा शोध लागलेला नाही आज मितीस चार दिवस उलटून गेले‌. तरीही बेपत्ता असलेल्या युवकाचा शोध लागला नसून शोध मोहीमही थांबविण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबीयांना आपला मुलगा कसा मिळेल ही चिंता सतावत आहे मात्र त्यांची ही चिंता आता धूसर होत चालली आहे. सदर तरुण हा गडचिरोली जिल्हा चामोर्शी तालुक्यातील कीस्टापूर येथील रहिवासी असून या गावातही शोकमग्न वातावरण आहे‌. 🟥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत