💻

💻

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार. #Accident #death

पोंभूर्णा :- पोंभूर्णा मुख्य मार्गावरील चिंतामणी महाविद्यालय नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक १८ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दि.२३ आगस्टला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
पोंभूर्ण्यात असलेल्या आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनासाठी आलेल्या प्रितम रघुनाथ परचाके रा.चामोर्शी हा दि.२३ आगस्टला आपल्या पुतण्या रोहित मडावी रा. पारना ता.सिंदेवाही याचे पोंभूर्णा चिंतामणी महाविद्यालयात इयत्ता ११ वी सायन्स करिता प्रवेश घेण्यासाठी शाळेत आला होता. #Accident #death
 
         अडमिशनसाठी जात असताना पोंभूर्णा आक्सापूर मार्गावरील चिंतामणी महाविद्यालय नजीक एका अज्ञात वाहनाने मागुन दुचाकीला धडक दिली.  धडक इतकी जबर होती की यात प्रितम परचाके जागीच ठार झाला. त्याला पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास पोंभूर्णा पोलिस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डि.एस.ओल्लालवार करित आहे. #Adharnewsnetwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत