कार्तिक सोमलकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत केला साजरा. #Socialwork

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- वाढदिवस म्हटलं केक, फुगे, आतिशबाजी अनं पार्ट्यांसह धांगडधींगा अशा अनेक गोष्टी आल्याचं. मात्र याला अपवाद ठरलंय ते राजुरा येथील समाजसेवक नवयुवक कार्तिक सोमलकर.या सर्व बाबींना बगल देत त्याच वाचलेल्या पैशातून शहरातील मोकाट व अनाथ मुक प्राणी, यांच्या सानिध्यात आपला वाढदिवस साजरा करीत जनावरांना चारा व क्ष्वान ला भोजन व पिण्याच्या पाण्याची सोय केली आगळेवेगळे स्वरुपात आपला वाढदिवस साजरा करुन. वाढदिवसाची आठवण आयुष्यभर लक्षात राहील अशी सामाजिक बांधिलकी जोपासलि आहे.#Adharnewsnetwork


सध्या संपुर्ण देशात २४ मार्च पासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आलाय.त्यामुळे सर्व रस्ते ओस पडले होते त्यामुळे मुक प्राणी मोकाट जनावरें व क्ष्वानावर मोठं संकट ओढावलेयं होते त्यामुळे डोळ्यादेखत किंवा कुणाच्या माहितीने मुक प्राण्यावर संकटं ओढावल्याची माहिती मिळताच मी व माझ्या सहकार्याच्या मदतीने मुक प्राण्यांच्या मदतीला धावून वेळेवर मदत पुरवण्याचे कार्य कार्तिक सोमलकर व सवंगडी कडुन केलें जात असल्याने हे कार्य ख-या अर्थी समाजहित जोपासणारे असुन या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ललित मारोती लांन्डे अभिजित बोरकुटे अभिषेक कोरडे फराज शेख उद्देश लांन्डे शुभम सोयाम अनिकेत सोमलकर कपिल ठाकरे चिन्टु ईपावार समाजसेवी मारनिग ग्रुपचे सचिव कोमल ठाकरे क्रेद्रीय मानवाधिकार आयोगचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विलास खिरटकर किशोर भोज वसिम शेख आकाश रोठोड यावेळी उपस्थित होते.#Socialwork