💻

💻

ग्रा. प. पाथरी ग्रामसेवकाचा भोगळ कारभार. #saoli


बनावट पावती देऊन नागरिकांची केली लूटमार.
सावली:- सावलीतालुक्यातील पाथरी ग्रामपंचायत सर्वात मोठी असून 11 सदस्य या ग्रामपंचायतीत आहेत. मागील कार्यकाळात कांग्रेस प्रणित एक हाती सत्ता होती त्या काळात सरपंच तथा कमेटी यांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामसेवकाने ग्रामपंचायत कर्मचारी यांना घेऊन कर वसुली च्या बनावट पावत्या देऊन चक्क पाथरी वासियांची लूटमार केल्याचे समोर आले आहे. या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्राम विकास आघाडीने चार उमेदवार रिंगणात उभे केल्यानंतर चारही उमेदवार निवडून आणले व भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने पाथरी ग्रामपंचायत मध्ये सत्ता बसविली. त्या नंतर गावाच्या विकासात्मक कामाला सुरुवात करताच कोरोनाची दुसरी लाट आली.
ग्रामपंचायत पदाधिकारी व पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीने गावकऱ्यांच्या सहकार्याने कोरोनाचा सामना करण्यासाठी गावात कोवीड सेंटर निर्माण करून अनेक कोवीड रुग्णांना मदत करून कोरोना मुक्त केले. ग्रामपंचायत चा कारभार सांभाळत असताना अनेक अडचणी लक्षात येऊ लागल्या. त्यातच बनावट पावतीचे प्रकरण समोर आले. ज्या नागरिकाना बनावट पावती देऊन नागरिकांची दिशाभूल करून लूटमार केली अश्या नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात पावती घेऊन अर्ज सादर करून तपासणी करण्याचे सांगितले. यामध्ये बऱ्याच नागरिकांनी बनावट पावत्या व अर्ज सादर केले परंतु ग्रामसेवक यांनी तीन महिने लोटूनही मासिक सभेत नागरिकांच्या अर्जाचा विचार करून नागरिकांना न्याय दिलेला नाही या बाबतीत पदाधिकारी यांनी वारंवार विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे ग्रामसेवक यांच्या कडून मिळाली. पाथरी ग्रामपंचायत मध्ये गाळे चाळ किराया, घर टॅक्स, नळाचे टॅक्स,पाणी पट्टी कर, अशे अनेक कर नागरिकांकडून घेतले जात असून ग्रामसेवक यांनी कर्मचारी यांच्या वतीने बनावट पावती देऊन कर वसुली केले त्या कराची वसुली बुकावर व कॅश बुक वर नोंद न केल्याने नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी पंचायत समिती सावली चे संवर्ग विकास अधिकारी यांचे कडे करणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत