जाहिरात... Advertisement... विज्ञापन

माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते 105 वर्षीय ज्येष्ठाचा भावपुर्ण सत्कार. #Hospitality(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- निंबाळा येथील भोई समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री धोंडूजी गोविंदा मोटघरे यांनी 105 व्या वर्षात पदार्पण केल्याबध्दल त्यांच्या 4 मुलांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन दि.14.09.2021 रोजी करण्यात आले. माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गावकऱ्यांच्या वतीने भावपुर्ण सत्कार करण्यात आला.#Adharnewsnetwork


गरीब परिस्थिती असतांना सुध्दा प्रत्येक समाजातील युवा पिढीला मार्गदर्शक ठरावा असा स्तुत्य कार्यक्रम घेऊन त्यांच्या डोळ्यादेखत वडिलांचे ऋण फेडल्याबद्धल नातेवाईक व गावकऱ्यांनी त्यांचे पुत्र मधुकर मोटघरे, भिवसन मोटघरे, जनार्धन मोटघरे, रामचंद्र मोटघरे यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला गुलाब महाराज राठोड, ग्रा. पं. सदस्य दीपक झाडे, साखरी येथील काशीनाथ पा. गोरे, चिंचोली येथील माजी सरपंच अर्जुन पा. पायपरे, गोवरी येथील लहू पा. बोरकुटे, पो. पा. पाल, माजी पो. पा. सुरेश उरकुडे, महादेव मेश्राम, विठ्ठल पाल, जनार्धन मोटघरे, साईनाथ शेरकी उपस्थित होते. मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर मोटघरे परिवाराच्या वतीने गावभोजन देण्यात आले.#Hospitality

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत