महिलांना सुरक्षित करण्यासाठी अट्रॅसिटी सारखा कठोर कायदा करावा:- अल्का आत्राम #Pombhurna

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडी पोंभुर्णाच्या वतीने साकीनाका येथे अंत्यत क्रूर पणे बलात्कार करून हत्या केलेल्या आरोपीला फाशी द्या तसेच चंद्रपूर जिल्यातील वरोरा येथे अल्पवयीन झालेला बलात्कार तसेच चंद्रपूर येथे एकतर्फी प्रेमातून झालेली हत्या या सर्व आरोपीना कठोर शिक्षा व्हावी तसेच सरकारने त्याबद्दलचे कायदे कठोर करावे यासाठी भाजपा महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार पोंभुर्णा मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष वैशाली बोलमवार, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सुनीता म्यॅकलवार, भाजपा महिला आघाडी सचिव श्वेता वनकर, भाजपा महिला आघाडी सचिव रजिया कुरेशी, सुलभा पिपरे, तसेच सर्व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.