Click Here...👇👇👇

व्याहाड परीसरात युरिया खताचा तुटवडा. #Saoli

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सध्या खरीपाचा हंगाम सुरु असुन व्याहाड खुर्द आणि व्याहाड खुर्द परिसरातील गावांमध्ये युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे या परिसरातील शेतकरी बांधवाना युरिया खताचा खताकरीता बरेच परिश्रम घ्यावे लागत आहेत. युरिया खताकरिता बऱ्याच लांब दूरवरून युरिया खत मिळविण्या करिता शेतकऱ्याना अवाढव्य खर्च करावा लागत आहे. वास्तविक व्याहाड खुर्द येथे मान्यता प्राप्त पाच कृषी केंद्र आहेत.
परंतु सहकारी सोसायटीलाच खत विक्री करण्याची परवानगी देण्यात आली. विद्यालक्ष्मी – कृषी केंद्राला खत विक्रीचे लायसन्स देण्यात आले परंतु त्यांनाही खत विक्री करण्यास मनाई करण्यात आली. खत विक्री करिता कृषी केंद्रांना परवानगी देण्यात यावी. अशी मागणी कृषी केंद्र संचालकानी केली असून शेतकरी बांधवांची होणारी हालअपेष्टा थांबवावी अशीही विनंती केली आहे. #साभार