चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील प्रसिद्ध सातबहिणी डोंगर पर्यटन स्थळ, जे पेरजागढ आणि सोनापूर गावांच्या जवळ आहे, ते अतिवृष्टीमुळे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे.
तळोधी (बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या या पर्यटन स्थळावर अतिवृष्टीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जीवित व वित्तहानी टाळता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, मान्सून कालावधीत (ऑरेंज अलर्ट/रेड अलर्ट) अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे पर्यटन स्थळ बंद राहणार असल्याचे चंद्रपूर पोलिसांनी कळवले आहे. पर्यटकांनी व नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.