पोंभुर्णा:- सेल्लूर नागरेड्डी येथील रहिवासी, वेळवा ग्रामपंचायतचे सरपंच जितेंद्र मानकर यांच्या मालकीच्या थ्रेशर मशीन चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोंभुर्णा पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (ता. ११) अटक केली.
सेल्लूर नागरेड्डी येथील बस स्थानक चौकात असलेली मालवा कंपनीची लगभग २ लाख ८० हजार किमतीची थ्रेशर मशीन २९ जून रोजी रात्री चोरीला गेला होता. यासंदर्भात पोंभुर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोंभुर्णा पोलीस स्टेशनच्या पथकाला थ्रेशर मशीन चोरीतील दोन आरोपी चंद्रपूर मध्ये असल्याची माहिती मिळाली होती.ज्ञत्यानुसार पथकाने चंद्रपूर येथून रोहित भगरत पावडे (वय २३) व यश भास्कर वडस्कर (वय २२ दोघेही रा.चेक ठाणेवासना येथील आरोपींना अटक केली. आरोपीची अधिक चौकशी केल्यास त्यांनी थ्रेशर मशीन चोरी केल्याची कबुली दिली.
चोरीतील दोन्ही आरोपी हे सदन कुटुंबंतील असून मोबाईल मधील ऑनलाईन सट्टात पैसे हरल्याने निराशा होऊन चोरी करून पैसा मिळवण्यासाठी थ्रेशर मशीन चोरण्याचा डाव टाकला चेकठाणेवासना येथील ट्रॅक्टरच्या साह्याने सेल्लूर नागरेड्डी येथील सरपंच जितेंद्र दिलीप मानकर यांच्या मालकीची मालवा कंपनीची थ्रेशर मशीन चोरून आक्सापूर येथे नेण्यात आली. तेथून दोन दिवसांनी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या साह्याने जुनोना येथील व्यसनमुक्ती केंद्राजवळ ठेवली. बाबुपेठ चौक येथील भंगार विक्रेत्याला सोबत घेत पिकअप वाहानानी चंद्रपूर येथील हिंदुस्थान भंगार विक्रेत्याला विकल्याची माहिती त्यांनी दिली.
आरोपी विरुद्ध कलम ३०३(२) गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली. व पुढील तपास ठाणेदार राजकमल वाघमारे, पोलीस हवालदार नरेश निमगडे, शिपाई कादेवणी आमटे,पोहेकर करीत आहेत.