जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित द्या. #Saoli #saolinews

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांना निवेदन.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांचे अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचा वेतन विलंब न करता दर महिन्याच्या एक तारखेला देण्यात यावे असे आदेश काढण्यात आले होते. परंतु एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर च्या वतीने अनुदानित आश्रम शाळेचे वेतन अजुनपर्यंत देण्यात आलेले नाही. #Saoli #saolinews
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर द्वारा अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचा माहे जुलै ते सप्टेंबर पर्यंत वेतन देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी बँकेमधून उचललेलं कर्ज हे वाढतच जात असल्याने नाहक मानसिक त्रास सहन कराव्या लागत आहे.
             
      दिनांक 3/9/2021 रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर द्वारा जुलै महिन्याचा वेतन तात्काळ सादर करावे असे पत्र देऊन आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांना आदेश देण्यात आले होते. सदर या आदेशाची कुठलीही दखल न घेता शेवटी कर्मचाऱ्यांचे वेतन हे ताटकळीत ठेवण्यात आले तर याला जबाबदार कोण?. अशा बेजबाबदार वृत्तीने कर्मचाऱ्यांचे शोषण होत असून त्यांच्या कौटुंबिक जीवनाशी खेळ खेळल्या जात आहे. अशा बेजबाबदार मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्यात यावी व कर्मचाऱ्यांचा वेतन हे त्वरित देण्यात यावे अशी मागणी आदर्श मीडिया असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ च्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांना करण्यात आली. यावेळी प्रिया झांबरे, संगीता वनकर, संदीप झगडकर, व मनोजराव यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत