गडचिरोली जिल्हयातील पूर स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल. #Gadchiroli
दिनांक : 14.09.2021, सायं: 6.30 वाजता.
1. वैनगंगा नदी.....
गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 24 गेट 0.50 मी. ने व 9 गेट 1.0 मी. ने उघडलेले असुन 4834 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. #Gadchiroli
आज रात्रो 10.00 वाजेपर्यंत विसर्ग 5000 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येणार असल्याने नदी काठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.
चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 6608 क्युमेक्स आहे. नदीची पाणी पातळी पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.
2. वर्धा नदी......
निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 11 गेट उघडलेले असुन विसर्ग 306 क्युमेक्स आहे. बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
3. प्राणहिता नदी.....
प्राणहिता नदीची पाणी पातळी महागांव व टेकरा सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.
4. गोदावरी नदी.....
लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 57 गेट उघडलेले असुन विसर्ग 13,711 क्युमेक्स (4,84,220 क्युसेक्स) आहे. गोदावरी नदी काठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी. गोदावरी नदीची पाणी पातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.
5. इंद्रावती नदी.....
इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे. पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील सायं. 5.30 वाजताच्या नोंदीनुसार पूलाच्या 2.05 मी. ने खाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत