पोंभुर्णा तालुका नाभिक संघाच्या तालुकाध्यक्ष पदी अतुल कोपावार यांची निवड. #Appointment

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील नाभिक समाजाच्या वतीने नुकतीच सभा आयोजित करण्यात आली या सभेत अतुल नामदेव कोपावार यांची नियुक्ती तालुकाध्यक्ष म्हणून एकमताने मंजूर करण्यात आले.
अतुल कोपावार हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभागी होत समाजसेवा करीत असतात त्यांनी जनतेचे प्रश्न घेऊन जनतेला न्याय मिळवून दिला आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन तालुका नाभिक समाजाच्या वतीने त्यांना समाजसेवा करण्याची संधी दिली आहे त्यांना एकमताने तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. या पदाला न्याय देऊन समाजाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीन असे नवनियुक्त अध्यक्ष यांनी सांगितले आहे. त्यांच्या निवडिबद्दल संतोष चलाख,शशिकुमार कांबळे, अविनाश कुमार वाळके, विजय वासेकर, अभिजित कोपावार राजु कोपावार वामन नारायन गुदरपवार , सुनिल पंदिलवार,रत्नाकर देव ईकर,किरण कानमपल्लीवार, इत्यादींनी अभिनंदन केले आहे.