जाहिरात... Advertisement... विज्ञापन

राजुरा मुक्ती संग्राम दिनाप्रित्यर्थ राजुरा येथे एसडीओ खलाटे यांच्या हस्ते झाले शासकीय ध्वजारोहण. #Rajura

माजी आमदार सुदर्शन निमकर व नगराध्यक्ष अरुण धोटे यांची प्रमुख उपस्थिती.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना व दोन दिवसानंतर म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्यासह पूर्वीचा राजुरा तालुका व आजचे राजुरा, कोरपना व जिवती हे तालुके निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेततृत्वात लढलेल्या लढ्यात या भागातील देशभक्तांनी सुध्दा भाग घेतला होता.#Adharnewsnetwork


   निजामाची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी देशाचे पाहिले गृह मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी सैन्य चढाई चे आदेश देऊन निजामाच्या राजवटीतून याचदिवशी निजामाच्या अधिपत्याखालील संस्थान देशात विलीन केले. 


या प्रीत्यर्थ दरवर्षीप्रमाणे मुक्तीसंग्राम दिनाचे शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दि.17.09.2021 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते केले जाते यावर्षी उपविभागीय अधिकारी श्रीयुत खलाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते देशोन्नती वृत्तपत्रातील "राजुरा मुक्तीसंग्राम दिन" विशेषांकाच्या पुरावणीचे प्रकाशन करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार हरीश गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, न. प. चे मुख्याधिकारी श्री पिदूरकर, पोलीस निरीक्षक श्री बहाद्दूरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे व प्रतिष्ठित व्यक्तीसह कर्मचारी उपस्थित होते.#Rajura

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत