🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

नागरिकांना योजनांचा लाभ त्वरित देण्यात यावे. #Ballarpur

कोणतेही लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे
बल्लारपूर:- तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहे व मागील दोन महिन्यांपासून या लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारे पैसे न मिळाल्याने यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी दिनांक 27/09/2021 रोजी महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच हा विषय मार्गी लावण्याकरिता आपण शासनाकडे मागणी करू व सर्व लाभार्थ्यांना न्याय देऊ असे माननीय सुधीरभाऊ बोलले. तसेच दिनांक 25/09/2021 रोजी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात माननीय श्री संजय राइंचवार साहेब तहसीलदार बल्लारपूर यांच्याशी सुद्धा या विषयावर चर्चा केली व लवकर लाभार्थ्यांना पैसे मिळवून द्यावे अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले
याप्रसंगी भाजयुमो जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, ट्रान्सपोर्ट आघाडी तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा,भाजयुमो जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, भाजयुमो विद्यार्थी आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रतीक बारसागडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे, सुजित निर्मल,मनीष रामीला,मोहित डंगोरे,श्रीकांत उपाध्याय,अशोक सोनकर, रिंकू गुप्ता,प्रकाश दोतपेल्ली, सुधाकर पारधी,शुभम बहुरिया, राजू निषाद,श्रवण मोगरम,आकाश ननावरे, अविनाश आधे, कधीर भाई,कौसर भाई तसेच अनेक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत