🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अखेर कोरोना काळात बंद केलेली भद्राचलम-सिरपूर टाऊन मेमो एक्सप्रेस चंद्रपूर पर्यंत धावणार. #Train(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा - दक्षिण मध्य रेल्वे च्या महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील बल्लारशा स्टेशन पर्यंत येणाऱ्या गाड्या कोरोना संक्रमण काळापासून बंद करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर सदर रेल्वे गाड्या मागील सहा महिन्यांपासून सिरपूर- कागझनगर पर्यंतच चालवल्या जात होत्या. यामुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील तेलगू भाषिक लोकांना तेलंगणात जाणे येणे करण्याकरिता अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत होता.
ट्रेन सुरू करण्याकरिता चुनाळा-माणिकगड, सास्ती, बल्लारपूर व विरुर परिसरातील तेलगू जनतेच्या वतीने सतत मागणी केल्या जात होती. यासंबंधाने माजी आमदार सुदर्शन निमकर व माजी आमदार संजय धोटे यांनी या भागातील प्रतिनिधी समवेत नुकतीच दि.06.09.2021 रोजी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद डिव्हिजन चे जनरल मॅनेजर श्री माल्या व संबंधित अधिकारी या भागात दौऱ्यावर आले असतांना गडचांदूर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली व समस्या मांडून बंद केलेल्या ट्रेन त्वरित सुरू करण्याची मागणी केली होती.#Adharnewsnetwork
ट्रेन सुरू करण्याचे निर्देश रेल्वेप्रशासनाला देण्यासाठी चे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. ना. रावसाहेब दानवे यांना पाठवून, ट्रेन सुरू करण्यासंबंधी पाठपुरावा करण्यासाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज भैया अहिर, महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती चे अध्यक्ष, माजी मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व संबंधी सर्व अधिकाऱ्यांना दिले होते. सर्वांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे बंद केलेल्या ट्रेन पैकी एक ट्रेन भद्राचालम-सिरपूर (टाऊन) मेमो एक्स्प्रेस गाडी क्र.07760/07271 ही ट्रेन सुरु करण्यास द. म. रेल्वे च्या सिकंदराबाद हेडक्वार्टरच्या वाहतूक शाखेच्या कार्यालयाने पत्र क्र. टी.75/CAB/52/2021, दि.23.9.2021 च्या आदेशान्वये रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आले आहे. आता लवकरच एक का होईना ट्रेन सुरू होत असल्यामुळे या भागातील तेलगू भाषिक जनतेची दळणवळणाची मोठी समस्या मार्गी लागत असल्यामुळे जनतेच्या वतीने समाधान व्यक्त केल्याजात असून ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्न करून पाठपुरावा करणाऱ्या वरील सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केल्या जात आहे. याप्रमाणे इतरही ट्रेन, रायपूर-सिकंदराबाद इंटरसिटी एक्स्प्रेस चा स्टॉप देणे, राजुरा येथे अंडरपास रेल्वे पूल व चुनाळा येथे अंडरपास पूल मंजूर करण्यासंबंधाने सुध्दा पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे.#Train

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत