Top News

गोरगरिबांचा विश्वास आणि भारतमातेचा आशिर्वाद हाचं मोदीजींचा ऊर्जास्त्रोत:- जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे. #Chandrapur

571 रुग्णांना चष्मे वितरण करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस भाजपतर्फे सेवा व समर्पण सप्ताहास प्रारंभ.

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ, साहित्याचे वितरण आणि कोविड योद्ध्यांचे सत्कार अश्या विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन.
चंद्रपूर:- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, युगपुरुष नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने जनसेवेच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या शुभहस्ते येथील प्रयास सभागृहात आज संपन्न झाले. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा सप्ताह सेवा व समर्पण सप्ताह म्हणून जनसेवेच्या विविध कार्यक्रमांनी येथे साजरा होत आहे.

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे म्हणाले की श्री. नरेंद्र मोदी हे नाव आता केवळ भारतापुरते राहीले नाही तर आपल्यासारख्या गोरगरिब जनतेच्या आशिर्वादाने मोदिजी जागतिक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. नेहमी भारताच्या विकासाचा आणि देशातील गोरगरिबांच्या उन्नतीचा विचार घेऊन कार्य करणारे मोदी देशातील पहिलेच पंतप्रधान आहेत. असे आज गर्वाने म्हणावे वाटते. मोदींनी अशक्य ते शक्य असे अनेक मोठी निर्णय देश हितासाठी केले. देशातील गोरगरिब जनता विकासाच्या प्रवाहात यावी, यासाठी मोफत उज्ज्वला गॅस, प्रधानमंत्री आवास, घरोघरी शौचालय, किसान विमा, किसान सन्मान योजना, मुद्रा लोन, आयुष्यमान भारत, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या शेकडो लोककल्याणकारी योजनांसह अनेक वर्षे प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी रास्त समाधान शोधले, लोकहितात मोठे निर्णय घेतले. आज देशात असे कुठलेच क्षेत्र नाही ज्याच्या उन्नतीसाठी मोदी सरकारने काही केले नसेल. मोदींनी देशातील सैन्यांसह सीमेवर दिवाळी साजरी केली. देशाचे सैन्यबळ अद्ययावत करून भारतीय सैन्याचे मनोबल वाढविले. इतकेच नव्हे तर शत्रुराष्ट्रांनाही भारताच्या नावाने धडकी भरविण्याचे कामही मोदींनीच केले.
आज देशावर नव्हे जगावर कोरोणाचे संकट कोसळले, जगातील मातब्बर देशही कोरोणापुढे हतबल झाले. परन्तु अशा परिस्थितीतही भारतीयांचे मनोबल वाढविण्यापासून तर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी ७५ कोटी भारतीयांचे लसीकरण पूर्ण करण्याचे कार्य देखील मोदींच्या नेतृत्वात यशस्वी झाले.
सदैव 'राष्ट्रप्रथम' ही भूमिका घेऊन भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक विकासाला प्राधान्य देणार्‍या मोदींजींचा आणि या युगपुरुष नेत्याला घडवणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे, याचा मला अभिमान वाटतो. यापुढेही देशातील शेवटच्या घटकाच्या चेहर्‍यावरच्या समाधानासाठी अहोरात्र काम करण्याची संधी आणि बळ ईश्वर मोदीजींना देवो.
घुग्घुस येथे नागरिकांसाठी आजपासून अनेक सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यात, ५७१ रुग्णांना चष्मेवाटप करण्यात आले, २७१ जेष्ठ नागरिकांना काठीचे वाटप, ७१ लाभार्थ्यांना नविन राशन कार्डचे वितरण, तसेच १७१ मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया, तर जनधन योजनेच्या ७१ लाभार्थ्यांना पासबूक खात्याचे वितरण, यासोबतच शहरातील ७१ फेरीवाल्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप, ७१ गरजू नागरिकांना ब्लॅन्केटचे वाटप, ७१ गोरगरिबांना अन्नधान्य किट, शहरातील ७१ कोरोणा योद्ध्यांचा सत्कार व सन्मान, ७१ बचत गटांसाठी कर्ज मेळावा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सेवा व समर्पण सप्ताहात करण्यात आले असून आज या सप्ताहाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी मंचावर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरे, माजी जि. प. सभापती नीतू चौधरी, प.स. माजी सभापती निरीक्षण तांड्रा, विजय आगरे, घुगुस भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने, नकोडा सरपंच किरन बांदूरकर, मंगेश राजगडकर, पुनम शंकर, रत्नेश सिंह, मल्लेश बल्ला, मधुकर मालेकर, सुनील राम, महेश लट्टा, पूजाताई दुर्गम, नंदाताई कांबळे, पारस पिंपळकर, ऋषी कोवे, राजेश मोरपाका, लक्ष्मण कलवल, संजय भोंगळे, वैशालीताई ढवस,  प्रवीण सोदारी, अजय आमटे, स्वप्नील इंगोले, मधुकर मालेकर,  विवेक तिवारी, राजू डाकुर, इम्तियाज रज्जाक, अनंता बहादे, विनोद जांजरला, सुनिता पाटील, गणपत चौधरी, खलिल अहमद, भारत साळवे,  कोमल ठाकरे, राजेंद्र लुटे, सीनु कोत्तूर, मानस सिंह, अतुल चोखंद्रे, रज्जाक शेख, वामशी महाकाली, चंद्रकला मन्ने, मुकेश कामतवार, सुशील डांगे आदींसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, लाभार्थी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने