Top News

विजेचा शॉक लागल्याने इसमाचा मृत्यू. #Death


गोंडपीपरी:-तालुक्यातील धामणगाव येथील 37 वर्षीय इसमाचा विजेचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना दि. 17 ऑक्टोंबरला धामणगाव येथे घडली आहे. मृतकाचे नाव राजू बोरकुटे वय 37 वर्ष रा.धामणगाव असे आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि.17 ऑक्टोबरला आपल्याच घरी असलेल्या पीठ दळण्याच्या चक्की साठी वापरत असलेल्या वीज मिटरची दुरुस्ती तथा पाहणी करीत असताना अचानक त्याला विजेचा जबर झटका बसल्याने तो खाली कोसळला. सदर व्यक्तीला ऑटोत टाकून ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले.
मृतदेहाची उत्तरणीय तपासणीकरून कुटुंबातील सदस्या कडे त्याचा मृतदेह सोपविण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा आप्त परिवार असून. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने