जाहिरात... Advertisement... विज्ञापन

शिवसैनिकांची नम्रगिरी...... #Humility #ShivSainiks #Shivsena.


चंद्रपूर:- शिवसेना आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र शिवसैनिकांतील नम्रता आणि सहनशक्तीही तेवढीच मोठी असल्याचे चंद्रपुरातील एका घटनेतून दिसून आले. शिवसैनिकांनी दाखविलेल्या नम्रगिरीमुळे मागील काही दिवसांपासून पुन्हा येथील शिवसैनिक चर्चेत आले आहे. लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता.

दरम्यान, काही आंदोलकांनी चंद्रपूर येथील बसस्थानक परिसरातील शिवभोजन केंद्राची तोडफोड केली. यामध्ये केंद्राचे काही प्रमाणात नुकसान झाले. आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांची शिवभोजन ही संकल्पना आहे. त्यामुळे तोडफोड करणे अपेक्षित नव्हतेच.

मात्र, चूक लक्षात येताच शिवसैनिकांनी नम्रपणे दिलगिरी व्यक्त केली. एवढेच नाही तर झालेल्या तोडफीडीचे नुकसानही भरुन देत नवीन खुर्च्याही घेऊन दिल्या. यामुळे केंद्र संचालकाने समाधान व्यक्त केले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे तरुण आहेत. त्यांच्यातील जोशही जबरदस्त आहे. मात्र, या घटनेमध्ये त्यांनी दाखविलेली तत्परता सध्या चंद्रपुरात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत