Click Here...👇👇👇

चंद्रपुरातील कुंदन प्लाझा चौकात चारचाकी वाहनाने घेतला पेट. #Fire

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर नागपूर महामार्गावरील हॉटेल कुंदन प्लाझा चौकात चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 24 तास सुरू असणाऱ्या या महामार्गावर कुंदन प्लाझा चौकात कार पार्क केली होती, मात्र काही वेळात त्या कार ने अचानक पेट घेतला.
नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला याबद्दल सूचना दिली, अग्निशमन विभागाने तात्काळ पोहचत आगीवर नियंत्रण मिळविले. ही कार कुणाची याबद्दल सध्या काही माहिती मिळाली नाही.