जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात विरुर स्टे. प्रवासी निवाराची स्वच्छता.#Socialwork(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, विरुर स्टे.
विरुर स्टे.:- येथील अनेक दिवसापासून विरूर पोलीस स्टेशन समोर बसस्थानक चौक जवळ प्रवासी निवारा येथे कचऱ्याने व घानेचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे लोकांना अनेक त्रास सहन करावा लागत होता. या प्रवासी निवाराकडे शासनाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे याकडे विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब राहुल चव्हाण यांनी पुढाकार घेऊन त्यांनी काही कामगार लावून व कर्मचारी वर्ग याना घेऊन परिसरातील कचरा व घाण साफ करण्यात आले. विरूर स्टे. परिसरात अनेक ग्रामीण गाव आढळते आणि या गावातील अनेक विद्यार्थी विरूर स्टेशन येथे शिक्षण घेण्याकरिता येत असतात सोबतच कॉलेज सुटल्यानंतर बस्टास्थानक येथे बस ची वाट पाहण्याकरिता कधी हॉटेल तर कधी झाडाखाली उभे राहतात त्यांना अनेक त्रास सहन करावा लागत होता. 
प्रवासी लोकांना पण याचा त्रास सहन करावा लागत होता तसेच गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात असायचे. त्यामुळे ठाणेदार साहेब राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी विजय मुंडे, प्रमोद मिलमिले, भगवान मुंडे, दिवाकर पवार मेजर, प्रलाद जाधव, विजू तलांडे, व कामगार यांच्या मदतीने परिसर स्वच्छ करण्यात आले. यामुळे नागरिकांना बसण्याकरिता एक सुंदर स्वच्छ प्रवासी निवारा मिळाल्याने नागरिकांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब राहुल चव्हाण व कर्मचारी लोकांचे मनापासून आभार मानले.#socialwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत