जाहिरात... Advertisement... विज्ञापन

कवच कुंडल अभियानांतर्गत शहरातील चुटकी संस्थेत लसीकरण शिबिर संपन्न. #Bhadrawati


नागरिकांचा उदंड प्रतिसाद.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- शासनाच्या कवचकुंडल अभियानांतर्गत शहरातील गौराळा प्रभागातील चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे संस्थेच्या कार्यालयात आज दिनांक 13 रोज बुधवारला कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत स्वतःचे लसीकरण करून घेतले. शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले. 
यावेळी चुटकी संस्थाध्यक्ष लिंगेश्वर माणूसमारे, नगरसेवक प्रफुल्ल चटकी, प्रतिभा निमकर, मीनाक्षी चिकनकर, माधुरी गोवारदीपे, करिष्मा पेंदोर, मनोज नागरकर प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरात पहिल्या आणि दुसर्‍या वेळेचे लसीकरण करण्यात आले. या शिबिरासाठी 200 लसीकरणाचे उद्दीष्टय ठेवण्यात आले होते. मात्र दुपारपर्यंत हा आकडा पार करीत नागरिकांनी लसीकरण करून घेतले.शहरातील कोणताही नागरिक लसीकरण केल्याशिवाय राहू नये व सर्व नागरिक कोरोणापासून लवकरात लवकर सुरक्षित राहावे. हा या कवच-कुंडल योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिराचा उद्देश होता. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माणुसमारे यांनी प्रभागातील नागरिकांचे आभार मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी संस्थेचे शंकर डोंगे श्यामकर आत्राम आदींनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत