Top News

अद्विक नर्सिंग इन्स्टिट्यूट सिंदेवाही येथे जागतिक एड्स दिन संपन्न #Sindewahi


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही तथा अद्विक नर्सिंग इन्स्टिट्यूट सिंदेवाही, संकल्प बहुउद्देशीय संस्था लिंक वर्कर प्रकल्प चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अद्विक नर्सिंग इन्स्टिट्यूट सिंदेवाही येथे जागतिक एड्स दिन आणि अद्विक नर्सिंग इन्स्टिट्यूट ची नव्याने आज पासून सुरुवात करण्यात आली. शाळा बाह्य ग्रामीण व शहरी मुलांना नर्सिंग कोर्स द्वारे उपजीविकेचे साधन निर्माण करण्याचे मुख्य उद्देश आहे असे संस्थेचे संचालक अनिल दिघोरे यांनी सांगीतले.
कार्यक्रमात सहभागी प्रमुख पाहुणे मा.डॉ. बडनोरे सर, मा. डॉ. रोशन झाडे सर, मा. डॉ. लाकडे सर, मा. डॉ. स्वप्नील गेडाम सर, मा. ढोरे सर (HIV समुपदेशक), मा. अमोल बन्सोड सर, मा. विरेन्द्र मेश्राम सर(कोविड योद्धा), मा. वनिता नालेवार (ग्रा.रु.समुपदेशक),मा. श्रद्धा ताजने (ग्रा.रु.प्रयोगशाळा तंत्रज्ञ), कु. श्रुष्टी कोवले (ANM), मा.अनिल दिघोरे संचालक अद्विक नर्सिंग इन्स्टिट्यूट संचालक,सदस्य राहुल वाघाडे ,ओमप्रकाश लांजेवार व सर्व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने