Top News

ट्रॅक्टरच्या धडकेत ५ वर्षीय मुलाचा मृत्यू #accident


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- चामोर्शी येथील सहकार नेते अतूल गण्यारपवार यांच्या गाडीची ट्रॅक्टरला धडक बसल्याने त्याचे चुलत भाऊ आनंद गण्यारवार जागीच ठार झाले. हा अपघात आज सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान ब्रम्हपूरी जवळ झाला.
हि घटना ताजी असतानाच आज सकाळी 10 वाजता चा सुमारास टॅक्टर आठवडी बाजारा कडुन बस स्टॅंडकडे जात असताना यथार्थ भास्कर कल्सार वय वर्षे 5 हा धावत रस्ता ओलंडत असतांना टॅक्टर समोर आला. व त्याला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सावली पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने