Top News

ट्रक्टरचे दोन तुकडे; एकाचा जागीच मृत्यू #accident


ब्रम्हपुरी:- चामोर्शी येथील सहकार नेते अतूल गण्यारपवार यांच्या गाडीची ट्रॅक्टरला धडक बसल्याने त्याचे चुलत भाऊ आनंद गण्यारवार जागीच ठार झाले. हा अपघात आज सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान ब्रम्हपूरीजवळ झाला.
सविस्तर असे की, आज पहाटेच्या सुमारास अतूल गण्यारपवार आणि त्यांचे चुलत भाऊ आनंद गण्यारपवार हे दोघ नागपूर येथे जात होते. ब्रम्हपुरीजवळ त्याच्या क्रेटा कारला समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले असून क्रेटा कार समोरून क्षतीग्रस्त झाली आहे. अपघात इतका भीषण होता की, आनंद गण्यारपवार हे जागीच गतप्राण झाले तर अतूल गण्यारपवार हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने