महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे रोजगार:- आ. गजबे armori

Bhairav Diwase
0
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
आरमोरी:- बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी महिलांना रोजगार Economic Development प्राप्त करून देण्याचे कार्य हे महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून होत असून छोट्या मोठ्या गावात छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू राहिले तर महिलांना रोजगार मिळून त्यांचे जीवन हे उन्नतीकडे नेण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ मदत करीत आहे.
त्यामुळे आरमोरी येथे ज्ञानदीप लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून येथील बर्‍याच महिलांना या उद्योगांमध्ये सामावून घेण्याचे चांगले कार्य हे लोकसंचालित केंद्र करीत आहे आणि हे बाकीच्या इतरही गावांना प्रेरणादायी ठरेल. तसेच इतरही गावात असे गृहउद्योग सुरू होतील आणि महिला आपली प्रगती करून घेतील, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ Economic Development गडचिरोली अंतर्गत ज्ञानदीप लोकसंचालित साधन केंद्र आरमोरी आर्थिक सहाय्य प्राप्त आदिवासी विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने तेजस्विनी ज्ञानदीप मिरची मसाला प्रक्रिया उद्योगागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे अध्यक्ष पवन नारनवरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप लोकसंचलीत साधन केंद्र आरमोरीच्या व्यवस्थापक अलका मेश्राम, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, महिला व बालकल्याण सभापती चांदेवार, डॉ. संगीता रेवतकर, पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष गोविंदराजन कवंडर, डॉ. मालाकर, आदिवासी विकास निरीक्षक श्रीकांत बेले आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)