Top News

भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूरातील सेवा केंद्र व युवा मोर्चा जिल्हा कार्यालयाचे आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन #ballarpur


आशिष देवतळेंच्या वाढदिवसाच्या दिवशी बल्लारपूरात मोफत रूग्ण तपासणी व औषधोपचार आणि ई-श्रम कार्ड शिबिर, ऑक्सिजन मशीनचे लोकार्पण तथा दिनदर्शिकेचे विमोचन संपन्न
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून (१८ फेब्रुवारी) भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बल्लारपूर शहरात अनेक सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
https://www.adharnewsnetwork.com/2022/02/ballarpur_20.html

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या सेवा केंद्राचे व युवा मोर्चा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन मा.सुधीरभाऊंच्या शुभहस्ते सकाळी पार पडले. तसेच सेवाकेंद्रात देण्यात आलेल्या ऑक्सिजन मशिनचे लोकार्पण व युवा मोर्चाद्वारा प्रकाशित नुतनवर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन देखील यावेळी करण्यात आले.
यासोबतच बल्लारपूरातील नागरिकांसाठी मोफत रूग्ण तपासणी शिबीराचे आयोजन करून त्यांना औषधगोळ्यांचे वाटप केल्या गेले. बल्लारपूर कामगार वसाहत आहे इथे मोठ्या प्रमाणावर बांधव असतात, त्यामुळे त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून जिल्हाध्यक्ष आशिष देवतळेंच्या संकल्पनेतून केंद्र सरकारकडून मोफत देण्यात येत असलेले ई-श्रम कार्ड लाभार्थ्यांना काढून देण्यात आले.
https://www.adharnewsnetwork.com/2022/02/ballarpur_20.html

या संपूर्ण कार्यक्रमाला लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, कामगार आघाडीचे प्रदेश महामंत्री अजय दुबे, भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हाध्यक्ष राजू दारी, भाजपा शहर अध्यक्ष काशीसिंग, जूम्मन रीजवी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, रघुवीर अहीर, महानगराचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम, पोंभुर्णा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सुलभाताई पिपरे, उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार, जिल्हा उपाध्यक्ष सतिश घोटे, नगरसेविका सुवर्णाताई भटारकर, जयश्रीताई मोहूर्ले, नगरसेवक अरुण वाघमारे, भाजयुमो जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, अरुण भटारकर, किशोर मोहूर्ले, सतीश कणकम,सतीश उपलेंचिवार, दिलीप वांढरे, केशव ठाकरे, गुलशन शर्मा, कैलाश गुप्ता,मनिश रामिल्ला, नगरसेवक दर्शन गोरंटीवार, नगरसेवक संजय कोडापे, गुरुदास पिपरे, ज्येष्ठ नेता बुचैया कंदीवार उपाध्यक्ष आशिष ताजणे, राहुल सुर्यवंशी, महेश श्रीरंग, मोहित डंगोरे, संदीप पोडे, मोहन चलाख, जिल्हा सचिव राहुल बिसेन,आशिष रणदिवे, मोहन कलेगुरवार, स्वातीताई देवाडकर, गुलशन शर्मा,मनीष रमिला, अजय मस्के, मंगेश मादेशवार, हितेश गाडगे, राहुल कावळे, बंडू बुरांडे,वैभव पिंपळशेडे, शिवाजी चांदेकर, रवि राठोड, पियूष मेश्राम, प्रतीक बारसागडे, योगेंद्र केवट, संतोष राठोड, नवराज परसुटकर, विवेक कोल्हे, आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शिबिरार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने