Top News

धिडशी येथे जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न #Rajura

राजुरा तालुक्यात प्रथमच विक्रमी असा निधी जी. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकूडे यांच्या माध्यमातून धिडशी गावच्या विकासाकरिता एकूण ८४.७२ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध

राजुरा:- दि १९ /०२/ २०२२ ला शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर धिडशी येथे जि. प. चंद्रपूर तर्फे जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांच्या मार्फत एकूण ८४.७२ लक्ष रुपयांच्या विकास निधीचे भूमिपूजन करण्यात आले.
जि. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे भाषणादरम्यान बोलताना धिडशी सारख्या होतकरू गावांना भौतिक सुविधांकरीता समोर पण निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन दिले. धिडशी गावाला विक्रमी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गावकऱ्यांनी सभापती यांचे आभार मानले.
यामध्ये सिमेंट काँक्रिट रोडला १० लक्ष रुपये, सिमेंट काँक्रिट नालीला ५ लक्ष रुपये, आर. ओ. प्लांट बसविणे करिता ५ लक्ष रुपये, वर्ग खोल्या बांधकाम करिता २२ लक्ष रुपये, मुख्य जलवाहिनीचे काम करण्याकरिता २८ लक्ष रुपये, हायमास्ट लावणेकरिता १.७२ लक्ष रुपये, बंधारा बांधकाम करिता १३ लक्ष रुपये, एकूण ८४.७२ लक्ष रुपयांचा विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
त्याप्रसंगी प्रामुख्याने उद्घाटक म्हणून माजी आमदार ॲड. संजय धोटे, अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रमुख उपस्थिती जि. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे, प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो महाराष्ट्र उपाध्यक्ष रघुवीर हंसराज अहिर, नगरसेवक राजू डोहे, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, माथरा सरपंच हरिदास झाडे, धिडशी सरपंच रीता हनुमंते, उपसरपंच राहुल सपाट, राहुल सूर्यवंशी, सचिन शेंडे, रवी गायकवाड, ग्राम सदस्य संतोष काकडे, विनोद कोरडे, मायाबई जिवतोडे, सिंधुबाई निखाडे, मंगला धोके, त.मु. स अध्यक्ष बंडू काकडे, सुरेश कौराशे, विशाल कौराशे ग्रामसेवक प्राजक्ता अडगोकर व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने